यवतमाळ : राष्ट्राचे भविष्य मानल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे पुढील नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याची मागणी येथील अंजुमन उर्दू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी आज { ता १४ } सकाळी ११ वाजता तहसिलदारांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली . शिक्षण संस्था किंवा शिक्षकांतर्फे अशा प्रकारचा हा विदर्भातील कदाचित पहिलाच निवेदन असेल , हे येथे उल्लेखनीय !

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे , मात्र अनेक तालुके व असंख्य गावे अशी आहे की जेथे कोरोनाचा अद्यापही शिरकाव झालेला नाही . तरी देखील सरसकट शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे तेथील विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहेएवढेच नव्हे तर राज्यातील टॉकीज व मॉल पन्नास टक्के उपस्थितच्या अटीवर सुरू आहे . त्याच धर्तीवर , किंवा एक दिवस आड व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू करावे , असे देखील निवेदनात म्हटले आहे . यात गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान होत आहे , तरी शासनाने याबाबत फेरविचार करावा , अशी मागणी यावेळी करण्यात आली . शिक्षण संस्था किंवा शिक्षकांच्या वतीने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत कदाचित हा विदर्भातील पहिलाच निवेदन असेल , हे येथे उल्लेखनीय !
अंजुमन उर्दू शिक्षण संस्थेचे सचिव हाजी सज्जू पहेलवान , मुख्याध्यापक सोहेल जावेद , उजमा कौसर , अनिस शेख , मुहम्मद तौकीर , मुहम्मद नूर , मुहम्मद अकील , मुहम्मद शफीक , सैयद मोहसिन , जियाउर्रहेमान , मजहर अहेमद खान , मुहम्मद हारून , मसूद अहेमद खान , मुहम्मद मुदस्सीर , नासिर अहेमद , मुहम्मद तन्वीर , मुख्तार खान , मुहम्मद नाजीम , अहेमद खान , रैहानुद्दीन आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते . तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले .