यवतमाळ : दिग्रस – उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकरुंना तत्काळ अटक करण्याची मागणी येथील लहुजी शक्ती सेनाकडून करण्यात आली आहे.

डाॅ.हनुमंत धर्मकारे यांची मंगळवार, ११ जानेवारीला अज्ञात इसमाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटणेचा यावेळी निषेध व्यक्त करुन ‘त्या’ मारेकरुंना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ प्रसिद्धी प्रमुख किशोर गवई,मंगलदादा चक्रे,किशोर कांबळे,गोपाल तायडे,शंकर तायडे,दिलीप कांबळे,सुदाम इंगोले,ओकार गायकवाड ,बाळु उबाळे,सुभाष साळवे,निखिल बंन्सोड,विजय वानखडे,गौर्वधन पवार,रवि तायडे,किशोर कदम, पि.जी.गावंडे,संदिप साठे,विठोबा आमटे,अनिल पवार,शुभम रूडे,अंकुश तायडे,आदी उपस्थित होते