यवतमाळ : उमरखेड येथील ए. के . कॉम्प्लेक्स येथे दावत -ए इस्लामी हिंद या सामाजीक व धार्मीक संघटनेच्या वतीने ए.के. कॉम्प्लेक्स उमरखेड येथे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते . तसेच धार्मिक व सामाजीक संघटना च्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले . अल्लाहचे पैगंबर हजरत मोहम्मद (स ) यांनी जी विचार आपणास जीवन जगण्याचे मार्ग व शांतीचे मार्ग दाखविले त्या मार्गावर आपणास चालण्यासाठी .दावत ए इस्लामी हिंद या धार्मिक व सामाजिक संघटनेच्या विचाराशी जुळावे लागेल . तसेच मुंबई येथून आलेले अमेर अत्तारी यांनी मागदर्शन केले .

आजच्या युगात प्रत्येक माणूस धावपळीच्या जीवनातून जिवन जगत आहे, या दरम्यान सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने व शांतता आणि जीवन कसे जगावे आणि यशस्वी कसे व्हावे यासाठी उमरखेड शहरात आमेर अत्तारी दावत ए इस्लामी हिंद मुंबई यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच संपुर्ण विश्वमध्ये कोरोना सारख्या महामारी ने थैमान घातले आहे या महामारी पासून सर्वाचे रक्षण करण्यासाठी ईश्वर अल्हाला प्रार्थना करण्यात आल्या .इज्तेमा यशस्वी करण्यासाठी अमजद अत्तारी, जाफर अत्तारी, नजीब अत्तारी, अझहर अत्तारी, हाजी रेहान आदींनी सहकार्य केले