दिग्रस येथील शिबिरात १७२ जणांची मोफत रक्तगट तपासणी
यवतमाळ : दिग्रस येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव , देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ ए पी जे अब्दुल कलाम फोरमतर्फे आयोजित मोफत रक्तगट शिबिराचा १७२ जणांनी लाभ घेतला . येथील कच्छी चौकात आयोजित सदर शिबिराचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले . डॉ एपीजे अब्दुल कलाम व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .

दिग्रसचे तहसीलदार सुधाकर राठोड उदघाटणीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे , चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रामदास बनगीनवार , अंजुमन उर्दू शिक्षण संस्थेचे सचिव हाजी सज्जू पहेलवान , मुरलीधर कांबळे , आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू उद्धव अंबुरे , गोपाल शाह , श्री बालाजी बँकेचे सचिव यशवंत सुर्वे-पाटील , माजी सैनिक प्रकाश नालमवार , आसिफ नागानी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पॅथॉलॉजिस्ट डॉ मनोहर राठोड , डॉ फिरोज शेख , डॉ असलम चौहान , सुधाकर राठोड , कासिम मलनस , लखन राठोड , रवी पवार , विराज राठोड यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल त्यांचा फोरमच्यावतीने सत्कार करण्यात आला . काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्रसिंह चौहान , गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलचे उपप्राचार्य शरीफ शेख , स्थानिक गुन्हे शाखेचे चेतन चव्हाण , धर्मराज गायकवाड , रामदास पद्मावार , आकाश काशीकर , हनुमान रामावत , सुरेश चिरडे , समीर पटेल , किशोर कांबळे , मंगेश दूद्दलवार , फारूक नागानी , जुबैर खान , साजिद पतलेवाले , आदींनी सदिच्छा भेटी देऊन आयोजनाबद्दल कौतुक केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजहर अहेमद खान यांनी , तर अरबाज धारीवाला यांनी आभार प्रदर्शन केले . निवृत्त गटशिक्षणाधिकारी हाजी शेख मुजफ्फर निवृत्त वनपाल हाजी नूर खान पठाण , हाजी शमशेर खान , पी पी पप्पूवाले , अरबाज धारीवाला , फिरोज खान , अमीन चौहान , सैयद अकरम , फारूक चौहान , अजीम खान , जुनैद शेख , फैसल पटेल , आसिफ शेख , जाकिर मलनस , अब्दुल अजीम , अब्दुल रफीक शेख , आसिफ काजी , सलीम शेख , सैयद गफ्फार , मुनीर खान , नासिर बेग , अताउर्रहमान खान , नय्यर अली मलनस , फिरोज पप्पूवाले आदींनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .