महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आयोजित १५ वा गौरवशाली दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अॅवॉर्ड सोहळा गोवा येथे मोठया उत्साहाने संपन्न झाला . परंपरेला साजेशा सोहळ्याचे उत्कृष्ठ नियोजन व संस्थाध्यक्ष डॉ राजीव लोहार यांची प्रभावी कार्यकूशलता व टिम एमजेएफ च्या सदस्यांची मौलीक मदत यामुळे समारंभ नियोजनबध्दरित्या पार पडला . समारंभ उपस्थित मान्यवरांपैकी प्रमुख समारंभाध्यक्ष , ज्येष्ट साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर साहेब यांचा आशिर्वाद लाख मोलाचा लाभला . भास्करचा तेजोमय प्रवास प्रेरणादायी असल्याचा आर्शिवाद खेडेकर सरांनी दिला . त्यामुळे येणा – या काळात अंत्यत प्रभावीपणे या समारंभाला विशिष्ठ उंची गाठता येईल असा विश्वास टिम एमजेएफ च्या सर्व सदस्यानी व्यक्त केली . गेल्या १५ वर्षापासून दरवर्षी गोवा येथील कला अकादमी मध्ये भास्कर अॅवॉर्ड पार पडतो
सन २००७ पासूनची ही परंपरा आजही अवाहयतपणे सुरू आहे . गोमंतकीय भूमीचा आर्शिवाद या समारंभाला लाभला आहे . मंगेशकर घराण्यातील ज्येष्ठाचा आर्शिवादही या समारंभाला लाभला आहे . ज्येष्ट समाजसेवक | डॉ . प्रकाश आमटे , विकासबाबा आमटे , समाजसेवीका सिंधुताई सपकाळ – माई यांनी गौरवांकीत करून स्विकारलेला भास्कर अॅवॉर्ड अलिकडच्या काळात सातासमुद्रापार पोहचला आहे . दिवसेंदिवस या पुरस्काराची उंची वाढत आहे . देश – विदेशातील अनेक दिगज कार्यकुशल मान्यवरांनी हा पुरस्कार स्विकारला आहे . अनेक मंत्री , खासदार , आमदार या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत . गोवा मध्ये पुरस्कार सोहळा पार पडत असताना पत्रकारितेतील अनेक ज्ञात – अज्ञात सहकार्यानी या सोहळ्यास यशस्वीतेसाठी मोलाची मदत केली आहे . गोवा राज्य पत्रकार | संघटनेचे विद्यमान अध्यक्ष यांचे सहकार्य नेहमीच मिळत राहीले आहे . सुरवातीपासून ही परंपरा कायम आहे . ज्येष्ट पत्रकार गुजच्या माजी अध्यक्षा सुहासिनी प्रभूगावकर , ज्येष्ट प गुरूदास सावळ , सुरेश वाळवे , किशोर गावकर यासह अनेक मान्यवरांनी संस्थेच्या या उपक्रमास सातत्याने प्रेरणा व पाठबळ दिले आहे . त्यांचे बध्दल संस्था नेहमीच आभारी राहील . मदतीची परंपरा ही अलिकडच्या काळात म्हणजे गुजचे विद्यमान अध्यक्ष राजतीलक नाईक यांचे पर्यंत अखंडीत आहे . याचा आम्हाला अभिमान आहे . भास्कर अॅवॉर्ड च्या सातत्यात कोरोना महामारीच्या काळात सन २०२० चा अपवाद वगळता सलग १५ समारंभाचे यशस्वी आयोजन पार पडले आहे . यंदाच्या समारंभ हा कोरोना मुळे प्रतिवर्षी प्रमाणे मे महिण्यात आयोजित करता आला नाही . तो पुढे डिसेंबर मध्ये आयोजित केला गेला . वास्तविक डिसेंबर हा काळ गोवा मधिल सर्वाधिक धावपळीचा काळ . यातच निवडणूकीची धांदल . अशाही परिस्थितीत भास्कर पुरस्कार सोहळा अंत्यत शानदारपणे पार पडला . हा समारंभ पार पाडण्यासाठी अनेक ज्ञात – अज्ञात पत्रकार मित्रांनी सहकार्य केले त्यांचे आम्ही आभारी आहोत . यंदाच्या समारंभास उपस्थित मान्यवरांमधील अनेक मान्यवर संस्थेवर प्रारंभिक काळापासूनच प्रेम करत आलेले आहेत . त्यांची उपस्थिती अपेक्षेप्रमाणे लाभली . यातच गोवा राज्यातील साहित्यिक क्षेत्रातील दोन ज्येष्ट दिग्गज मान्यवर पद्मश्री विनायक खेडेकर साहेब व ज्ञानपिठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो साहेब यांची या समारंभातील उपस्थिती लाख मोलाची ठरली . या मान्यवरांचे आर्शिवाद संस्था कधीही विसरू शकनार नाही.
मनिषा लोहार – संपादिका भास्कर भूषण