औरंगाबाद : 12 जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जयंती निमीत्त सिंदखेड राजा येथे वैजापूर-लासूर स्टेशन-बजाजनगर-क्रांती चौक औरंगाबाद असा पुढे जालना मार्गे जिजाऊरथ सालाबादाप्रमाणे याही वर्षी जात आहे. गंगापूर तालुका आणि लासुर स्टेशन परिसरातील शिवप्रेमींनी राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ रथाच स्वागत लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात मोठ्या उत्साहात स्वागत केले.याप्रसंगी अंनिसचे कार्याध्यक्ष भास्कर बनसोडे सर यांनी जिजाऊ वंदना म्हणून माॅसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले. याठीकाणी शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष संतोष आढाव सर यांनी प्रास्ताविक स्वरुपात राष्ट्रमाता जिजाऊं विषयी दोन शब्द मांडत पुढील वर्षी पासुन जिजाऊ रथाच आयोजन लासूर स्टेशन येथुन केले जाईल असे सांगितले.तसेच याठिकाणी मराठा सेवा संघाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष राजीव खिल्लारे आणि शिवसेना विभाग प्रमुख संदीप पाटील आढाव यांना कोरोणा योद्धा पुरस्कार देखील देण्यात आला.गंगापूर तालुका आणि लासूर स्टेशन परिसरातील तमाम शिवप्रेमींतर्फे जिजाऊ रथाच स्वागत करुन जिजाऊ रथाचे आयोजक मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाऊ वाघ व त्यांच्या टीमचे आभार राजीव खिल्लारे यांनी व्यक्त करुन जिजाऊ रथाला निरोप दिला.
याप्रसंगी मावळा प्रतिष्ठान चे डाॅ. रणजित गायकवाड,मराठा सेवा संघाचे गंगापूर तालुका अध्यक्ष श्रीकांत शेजवळ,छत्रपती युवा सेना मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पर्हाड पाटील,संकल्पपुर्ती अकॅडमी चे राजु शेळके सर,उद्योजक विजय पांडव सर,शिवसेना विभाग प्रमुख संदीप पाटील आढाव, शिक्षक सेनेचे अंगद लोणे सर,उपसरपंच बळीराम तांबे, युवराज पवार, गणेश गोरे,रोहण भाडाईत, गणेश गाजरे,संकल्पपुर्तीअकॅडमी च्या विद्यार्थीनी व सर्व विद्यार्थी व परिसरातील शिवप्रेमीं उपस्थित राहून जिजाऊ प्रतीमेस वंदन केले.
प्रतिनिधी:रमेश नेटके
गंगापूर औरंगाबाद
9823110410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *