गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नेपुर पूर्णा प्रकल्पा जवळच अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची ओळख अद्याप पर्यंत झालेली नसून प्रेत शवविच्छेदनाकरिता चिंचोली येथील आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. व तेथून मृतदेह शितगृहाकडे रवाना करण्यात आले.

यावेळी घटनास्थळी डी.वाय.एसपी शीलवंत नांदेडकर .पी.आई. संतोष खेतमालस , पिशोर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय कोमल शिंदे ,पी. एस. आय. विजय अहिरे,सोपान डकले,लालचंद नागलोत, सोनवणे,लगड यादी घटना स्थळी उपस्थित होते. पिशोर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती वर कलम ३०२, चा गुन्हा नोदविण्यात आला असून पुढील तपास ए.पी.आय कोमल शिंदे व त्यांची टीम करीत आहे.