औरंगाबाद : गोलवाडी फाटा ते वाळूज महामार्गावर मोठ्या प्रमणात वाहतुक कोंडीमुळे प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे या रस्त्यावर सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून असलेले आवश्यक ते कामे तत्काळ करावे अन्यथा सिडको बचाव कृती समितीच्या वतीने जागतिक बॅक प्रकल्प अधिकारी राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या विरूध्द तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.

रस्त्यावरील पथदिवे रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्यात यावे. डिव्हाईडर वरील झाडांची छाटणी नियमितपणे करावी. रोडचे साईड शोल्डर ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते भरून घ्यावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहे. या निवेदनावर सिडको बचाव कृती समितीचे अध्यक्ष उपसरपंच नागेश कुठारे, काकासाहेब बुट्टे, नरेंद्र यादव, शितल गंगवाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *