औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री माऊली नगर वडगाव को. येथे महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

राज्याभिषेक सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून अती उत्सवात पार पडला राज्याभिषेक साठी उमेश दुधाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाळूज महानगरचे अध्यक्ष यांच्या हस्ते महाराजांना दुध दही पाणी घालून अभिषेक करण्यात आला. या वेळी परिसरातील सोमनाथ शिंदे, सिताराम डव्हळे, सुनिल दरेकर, गजानन माळेकर, कुबेर दादा, श्रीमंत सोनुने, संदिप चेळेकर, शंकर दातिर, बापु थोटे, सुभाष पवार यांच्या सह शिवभक्त उपस्थित होते.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद