दिव्यांग कुटुंबाला चालू करून दिला व्यवसाय, वाढदिवस न साजरा करता सावली मुलींचे बालगृहास मदत
औरंगाबाद : बजाज कंपनीतील कामगार व कर्मचारी बंधूंनी आपला वाढदिवस साजरा न करता वर्षं भराचे पैसे एकत्र करून सावली मुलींचे बालगृह यांना 35000 रू टिन पत्रे घेऊन दिली व तिसगाव परिसरात राहणारे दिव्यांग कुटुंब ह्यांना राहाण्यासाठी घर नाही दोघेही मजूरी करू शकत नाहीत अश्या ह्या दिव्यांग कुटुंबाला व्यवसाय म्हणून आज चहाची टपरी व चहासाठी लागणारे सर्व साहित्य देऊन व्यवसाय चालू करून दिला.


या कार्यक्रमासाठी बजाज ऑटो रिक्षा विभागाचे मॅनेजर अभिजीत मस्के, गौरव गोती यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दत्ता वाकडे यांनी तर आभार प्रदर्शन गुणवंत हंगरगेकर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी उपस्थिती विष्णुदास पाटील ,नागेश आष्टुरे ,वसंत जाधव ,सत्यविजय देशमुख ,राजे मगर, दिलीप मांडगे, सुरेश बोर्डे व्यंकट केंद्रे ,सुरेश शिंदे, शिवाजी नळे ,गरजे, राजेन्द्र शिंदे, नामदेव काकडे, रमेश दांडगे, भरत महेर,ज्योतीराम जाधव, कृष्णा गुंड, दिव्या साहू व तनुजा या उपस्थित होत्या.