राजमाता जिजाऊ यांची जयंती वेगळया उपक्रमांनी साजरी

कोरोना नियम पाळत वैजापुर येथे टेनिस बॉलचे खुले सामने

नांदेड : मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापुर येथे ग्रामपंचायत पार्डी व मावळा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त टेनिस बॉलचे खुले सामने ठेवण्यात आले असुन कोरोना नियमांचे पालन करुन जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली .

तर या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतीमेला पुष्पहार आर्पन करुण करण्यात आले व युवांचा सर्वांगीन विकास होवावा या उद्येशाने टेनिस बॉल चे सामने ठेवण्यात आले होते. तर या सामन्यांची आज सुरुवात झाली आहे. तर या स्पर्धेमध्ये 50 टिम नी भाग घेतल्याचे सांगण्यात आले. टेनिस बॉलचे सामने ठेवल्यामुळे यथील युवांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसुन आले. तर यावेळी अर्चना होसरे सरपंच, सदानंद पवार उपसरपंच, चक्रधर पवार सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, शहाजी पवार तंटामुक्ती अध्यक्ष, गजानन महाजन ग्रामसेवक, साहेबराव टेामके, जि.प.शाळेचे मुख्यापक व शिक्षक, संजय शिप्परकर मुख्याध्यापक, अलताफ इनामदार, ज्ञानेश्वर पवार, बालाजी पवार, निगुण पवार, विशाल पवार, ओम पवार, अदिंची उपस्थीती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *