सांगली/आष्टा : बहुजन समाज हा राजकीय हक्कापासून वंचित आहे. सतत बहुजन समाजाला कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या पाठीमागे जाण्याची भूमिका घ्यावी लागत असे कारण त्यांना स्वतःचा पक्ष नव्हता आता स्वतंत्र राजकारण करण्यास बहुजन समता पार्टी स्थापन झाली आहे.

त्यामुळे बहुजन समाजाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, गेली तीस वर्ष मी दलित महासंघाच्या माध्यमातून दलित, बहुजन, आदिवासी वंचित घटकांच्या न्याय हक्काच्या प्रश्नांवरती सतत कार्य करत आलो आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यात बहुजन समाज इतरांच्या जसा पाठिशी उभा राहिला तसा बहुजन समाजाच्या पाठीशी कोणी उभा राहू शकला नाही याची जाणीव ज्या दिवशी मला झाली त्या दिवशी आम्ही बहुजन समता पार्टी ची स्थापना केली आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात समतेचं, न्याय हक्काचं, नव्या परिवर्तनाचं राजकारण करण्याचे ध्येय मनात बाळगून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातले राजकारण करण्यास मी सज्ज झालो आहे. आगामी काळात खऱ्या अर्थाने खरे राजकारण करू त्यासाठी बहुजन समता पार्टी स्थापन केल्याचे मत बहुजन समता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले. बहुजन समता पार्टी आष्टा येथील ‘राजकीय हक्क परिषदेत’ अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी बहुजन समता पार्टीच्या नेत्या प्रा.पुष्पलता सकटे, सांगली जिल्हा अध्यक्ष बळीराम रणदिवे, वाळवा तालुका अध्यक्ष विजय दणाणे, नेताजी मस्के, प्रदीप आवळे, आदींनी मनोगते व्यक्त केली.सदर कार्यक्रमास दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकरदादा महापुरे, स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महिला आघाडीच्या राज्य सचिव सौ. कविता घस्ते, दलित महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ सीमा आवळे, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते विकास लोंढे आष्टा शहराध्यक्ष पवन भैय्या गायकवाड बाबासो जाधव शशिकांत वारे राहुल अवारे मोहित वारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व आभार अमर गंगथडे यांनी केले.