अहमदनगर – बातमीशी प्रामाणिक राहून पूर्णवेळ पत्रकरिता करतांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असणारे राजेश सटाणकर यांना राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार मिळाला याचा ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चाला अभिमान आहे, असे उद्गार प्रख्यात दंतवैद्य डॉ.सुदर्शन गोरे यांनी काढले.
पत्रमहर्षी मोहनलाल बियानी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. सटाणकर यांचा जनमोर्चाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.गोरे बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते. कोरोना नियमांचे पालन करुन जनमोर्चाच्या प्रतिनिधीक उपस्थितीत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी पोलिस निरिक्षक एम.वाय.शेख यांनी स्वागत तर अभिषेक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, संत नामदेव देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, महिला संघटनेच्या माजी शहर जिल्हाध्यक्षा सौ.सविता मोरे, महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य शौकतभाई तांबोळी, जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, ज्येष्ठ नेते उबेद शेख, नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, भिंगार कमिटीचे कार्याध्यक्ष शामराव वाघस्कर, जनमोर्चाचे सरचिटणीस फिरोज शफी खान, वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आव्हाड, मोबाईल फर्मचे संचालक राजू पडोळे, युवा सर्वश्री अजय भुजबळ, उमर शेख, फजल खान, फरदिन खान, श्रावणी भुजबळ, जागरुक नागरिक मंचचे कैलास दळवी आदि उपस्थित होेते. शेवटी फिरोज शफी खान यांनी आभार मानले.