अमरावती : वंचित बहुजन आघाडी चांदूर रेल्वे यांच्यावतीने माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी चे अमरावती जिल्हा महासचिव प्रा.रविंद्र मेंढे, प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या चांदूर रेल्वे शहराध्यक्ष उषा मेश्राम उपस्थित होते.यावेळी शहर अध्यक्षा उषा मेश्राम यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करून माता रमाई यांना विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी अनिता धवणे, मायावती वानखडे यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर सुंदर गीत सादर केले. प्रज्ञा नन्नोरे,उषा मेश्राम व प्रा रवींद्र मेंढे यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला हिरू मेंढे,राजकन्या सावध,प्रेमचंद अंबादे, बेबीनंदा लांडगे,प्रतीक्षा ठाकरे,अविनाश राठोड यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवा आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते