अमरावती : निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतकरी एकूणच संकटात सापडला आहे. अशातच राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाणही वाढत आहे. या सगळ्यात मोर्शी शहरातील सुलतानपुरा येथील रहिवासी युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.