यवतमाळ : मुळावा ग्राम पंचायत अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कामा अंतर्गत तेथील अतिक्रमण हटवून रस्ता बांधकाम सुरु करावे या मागणी साठी मुळावा येथील 10 महिलांनी उमरखेड पंचायत समिती समोर 8 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरु केले होते . पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांनी लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्त्या महिलांनी समाधान व्यक्त केले . व गटविकास अधिकार्‍यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन आपले उपोषण मागे घेतले.


मुळावा येथील सरस्वती नारायण काळे यांच्यासह 10 महिलांनी दलीत वस्तीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम सुरु करावे या मागणीसाठी 8 फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले होते . उपोषण सुरु असतांना 9 फेबुवारी रोजी मुळावा ग्राम पंचायतने सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला आहे . व सात दिवसाचे आत रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे . सदर कामाची अंमल बजावणी न झाल्यास तेथील सरपंच सचिवावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे ठोस लेखी आश्वासन पं.स. चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांनी उपोषणकर्त्या महिलांना दिल्याने उपोषणकर्त्यांचे समाधान झाले व बिडीओंच्या हस्ते निंबू शरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली . यावेळी मुळावा येथील सरपंच जामकर , सहा . गटविकास अधिकारी अमोल चव्हाण , विस्तार अधिकारी मधुकर मुंडे आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *