गडचिरोली : भामरागड पारंपरिक इलाका गोटुल समिती व आदिवासी विद्यार्थी युवा संघटना तर्फे मौजा नेलगुंडा येथे १० फेब्रुवारी रोजी भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या 112 व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नेलगुंडा येथील गोटूल भूमी मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आदिवासी समाजाचा सप्तरंगी झेंडा फडकवून, आदिवासी समाजाचे महापुरुषांचे फोटोला दीप प्रज्वलित व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ऍड. लालसु नोगोटी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भामरागड पं. स. सभापती सौ. गोईताई कोडापे, जि. प. सदस्य ज्ञानकुमारी कोशी, उपसभापती सुखराम मडावी, लक्ष्मीकांत बोगामी, महेश वरसे होते. तसेच पेरगिलीचे उपसरपंच सुनील सोयाम, शामराव येरकलवार, श्रीकांत बंडामवार आदि उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडार दुर्वे यांच्या आंदोलना बद्दल माहिती देण्यात आली व भारत देशामध्ये इंग्रजी सरकार विरुद्ध आंदोलन केलेले सर्व आदिवासी समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची उजळणी करण्यात आली. तसेच आदिवासी संस्कृती, रीती रिवाज, प्रथा परंपरा टिकवून ठेवणे, आदिवासी समाजाचा पारंपरिक व संवैधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी म्हणून आपण संपूर्ण आदिवासी समाज एकत्र राहून, संघर्ष केला पाहीजे. तरच आपला आदिवासी समाज पुढे जाऊ शकतो अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भामरागड इलाका पट्टीतील आदिवासी समाजातील कर्मचारी वर्ग, पट्टीतील सर्व गाव – भुमिया, गायता, पेरमा सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली