गडचिरोली : जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली.
सदर सभेत जिल्ह्यातील सर्व गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाले पाहिजे तसेच सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याबाबत योजना राबविण्यात यावेत तसेच सिंचनाचे सुविधा व इतर विषयांवर चर्चा करण्यात आले. सदर बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे समाज कल्याण सभापती रंजनाताई कोडापे बांधकाम सभापती युधिष्टिर बिश्वास व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार उपस्थित होते
भास्कर फरकडे
एन.टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली