वाशिम – स्थानिक आयुडीपी परिसरातील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सुनंदा धाडवे, कपिल जाधव यांची उपस्थिती होती. अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व पुषहारर्पण करण्यात आले.

आपल्या मनोगतातून लॉ. धाडवे यांनी शिवरायांच्या कार्याचे वर्णन केले. आजच्या युवकांनी शिवरायांचा आदर्श घेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिपिक राहुल शेंडे यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी ताटेवार व आभार प्रदर्शन विद्या शिरसाट केले. या प्रसंगी कॉलेजचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
फुलचंद भगत