वाशिम – संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती तोंडगाव येथे संत रविदास चर्मकार युवा महासंघ व फाउंडेशन आणि जय रविदास मित्रमंडळ तोंडगाव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले आणी गुरू रविदास महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सहसचिव हनुमान फुलसावंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून महादु धाडवे, किसनराव धाडवे, विष्णू धाडवे, सिताराम धाडवे, एकनाथ धाडवे, तालुकाध्यक्ष बंडू धाडवे, किशोर धाडवे, तोंडगाव ग्राम उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धाडवे, तोंडगाव ग्राम संघटक विलास धाडवे, तोंडगाव ग्राम सचिव, गणेश धाडवे, तोंडगाव ग्राम सहसचिव, लक्ष्मण धाडवे, संतोष धाडवे, विठ्ठल धाडवे, तोंडगाव ग्राम कार्याध्यक्ष आशिष धाडवे, वाशिम तालुका सोशल मीडिया प्रमुख गजानन धाडवे, तोंडगाव ग्राम संपर्कप्रमुख प्रविण धाडवे, गोपाल धाडवे, तोंडगाव ग्राम अध्यक्ष गोविंदा धाडवे, तालुका कार्याध्यक्ष ओम धाडवे यांच्यासह माताभगिनी व समाजबांधव उपस्थित होते.
फुलचंद भगत