वाशीम : येथील अकोला नाका स्थित मॉ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पीटल व जुनी जिल्हा परिषदे समोरील लाईफ लाईन हॉस्पीटलला शिवसेना संपर्क प्रमुख तथा मुंबई नगर सेवक संजु आधार वाडे यांनी भेट देवून आज आरोग्यासोबतच सामाजिक उपक्रमाबाबत चर्चा केली. यावेळी मॉ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पीटलचे संचालक डॉ. हरिष बाहेती यांनी वाडे यांचा सत्कार केला. बाहेती हॉस्पीटल हे सामाजिक उपक्रमाचे जनक असून बाहेती दाम्पत्य आरोग्य सेवेसोबत सामाजिक ध्यान, योगा, प्राणायम व विविध क्षेत्रात कार्यरत असल्याबाबत त्यांनी त्यांचे कौतुक केले.

आज खर्या अर्थाने समाजाला दिशा देणार्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच लाईफ लाईन मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल येथे संचालक डॉ. सौरभ भुतडा यांनी वाडे यांचे स्वागत केले. जिल्ह्यात प्रथमच भुतडा अॅण्ड उदगिरे हार्ट केअर सेंटरची उभारणी करून अॅन्जीओग्रापी व अॅन्जीओप्लास्टीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. आता रूग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज नसल्याचे सौरभ भुतडा यांनी सांगून हॉस्पीटलमध्ये रूग्णांना मोपत डायलेसीस, महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य सुविधा मोपत उपचार उपलब्ध असून लवकरच किडनी ट्रान्स्पर युनिट सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी वाडे यांनी वाशीम जिल्हयातील रूग्णांकरीता ही मोठी उपलब्धी उपलब्ध केल्याबद्दल डॉ. सौरभ भुतडा यांचा सत्कार केला. आगामी नोव्हेबर महिण्यात वाशीम येथे भव्यदिव्य सामाजिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संजु वाडे यांनी यावेळी देवून सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.