वाशिम : कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने आदर्श ग्राम येडशी येथील समता मित्र मंडळ व युवा कार्यकर्ते मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा सारनाथ बुद्धविहीर येथे मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रत्येक समाजातून प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी व्हायला पाहिजे समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा याउद्देशाने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन येथील मंडळाच्या वतीने करण्यात येते.

१९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने २० फेब्रुवारी रोजी प्रभोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सुप्रसिद्ध गायक राहुल कांबळे व संच यांच्या गायनाच्या मध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवन चरित्रावर गायनाच्या मध्यमातून प्रबोधन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ गजानन हुले (जिल्हा अध्यक्ष वं ब आ)नारायन मिटकरी(जिल्हा मार्गदर्शक )उत्तमराव झगडे (जिल्हा सचिव)विनोद भगत (जिल्हा सचिव)संतोश लांभाडे (जिल्हा संघटक)दिवाकर चक्रनारायण (ता सचिव)सौरभ सपकाळ (युवा कार्यकर्ता )उपस्थित होते. त्यावेळी विशेष सहकार्य अवलिया महाराज मित्र मंडळ, संत सेवालाल महाराज मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले त्यावेळी गावातील सरपंच उपसरपंच आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

फुलचंद भगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *