यवतमाळच्या सुवर्णयुग क्रीडा मंडळाचा ३१ हजाराच्या प्रथम बक्षिसावर कब्जा
दिग्रस येथे खुल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ : क्षणा-क्षणाला या पारडयातून त्या पारड्यात जाणाऱ्या व प्रेक्षकांमध्ये उत्कंठता वाढविणाऱ्या चित्तथरारक अंतिम कबड्डी सामान्यात यवतमाळच्या सुवर्णयुग क्रीडा मंडळाने विजय मिळवला . त्यांना मान्यवरांच्या हस्ते ३१ हजाराचे रोख बक्षीस व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले . वाशीम जिल्ह्यातील देवठाणा येथील संत श्री सेवालाल महाराज मंडळाला २१ हजार रुपयाच्या द्वितीय पुरस्कारावर समाधान मानावे लागले . दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथील आत्माराम मंडळ व साखरा येथील जय सेवालाल मंडळाला ११ हजार व ७ हजार रुपयांचे क्रमशः तृतीय व चतुर्थ पुरस्कार देण्यात आले.
यवतमाळ येथील यशवंत मुसळकर व देवठाणा येथील आकाश चव्हाण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले . बलदेव जाधव , दत्ता राठोड , आकाश चव्हाण , रितेश राठोड , जगदीश राठोड व आयुष राठोड व कोंडाळा महाली येथील अनिकेत घुगे देखील वैयक्तिक रोख पुरस्काराचे मानकरी ठरले . या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक , अशी ८० हजारांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती . यवतमाळसह इतर जिल्ह्यातील असंख्य संघांनी यात सहभाग नोंदविला होता . पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू अविनाश चव्हाण , मूर्तिजापूर येथील दिवाकर काटे , खुर्शीद पठाण , विजय कांबळे व बंटी राठोड यांनी काम पाहिले .विकास राठोड गुणलेखक , गजानन पाटील वेळाधिकारी , तर देवा राठोड यांनी समालोचक म्हणून भूमिका पार पाडली . मजहर अहेमद खान व आमीन चौहान यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले , तर आयोजक व राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीचंद राठोड यानी प्रस्ताविक केले .
उद्घाटन , बक्षीस वितरण समारंभ व स्पर्धेदरम्यान माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख , शिवछत्रपती पुरस्कार विजेते रामुजी पवार , आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुसिंग जाधव , माजी नगराध्यक्ष शाम पाटील , विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक वानखडे , भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे , भाजप भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राठोड , नगरसेवक रुस्तम पप्पूवाले , डॉ संजय बंग , काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर जाधव , राष्ट्रीय कबड्डीपटू लक्ष्मण पवार , हेमंत चव्हाण , पुसद येथील माजी ठाणेदार देवराव राठोड , मुंबई येथील माजी ठाणेदार एन. डी. जाधव , सुरेश जाधव , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भारत पाटील , हंसराज राठोड , अनुराग पाटील , ऍड विवेक बनगीनवार , अभियंता गणेश चव्हाण , बाळासाहेब खांदवे , सुरेश शर्मा , अब्दुल हन्नान शेख , प्रदीप नगराळे , प्रा वसंत खाडे , माजी उपनगराध्यक्ष जावेद पटेल , अरविंद मिश्रा , देवराज अप्पा , ऍड नरेश मोरे , ऍड इरफान नौरंगाबादे , विजय इकडे , मुहम्मद मकसूद अहेमद , फैजान शेख , जयवंत सास्तिकर , अरुण दगडकर , पत्रकार , असंख्य कबड्डीपटू आदी मान्यवर उपस्थित होते .
महान संत श्री सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून श्रीनिता इन्फ्राद्वारा आयोजित करण्यात आलेल्या सदर दोन दिवसीय स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय खेळाडू सोनू राठोड , अविनाश चव्हाण , देवदीप धुर्वे , प्रज्वल राठोड , चेतन पाटील , साक्षी जाधव , अवी राठोड , गुड्डू इंगळेसह श्रीनिता इन्फ्राच्या सर्व सभासद व कबड्डीपटूंनी अथक परिश्रम घेतले .