तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवलंय ना..?
उस्मानाबाद : उन्हाळा सुरू झाला असून पारा वाढतच जातोय अश्यात पशु-पक्षी पाणी व अन्नच्या शोधात भटकंती करताना दिसत आहेत.कडक उन्हाच्या चटक्यात पशु-पक्षांना माणुसकीचा आधार लाभावं, यासाठी गरुडझेप फाऊंडेशन तर्फे “पक्षी बचाव” अभियान राबविण्यात येत आहे.

आपल्या आजूबाजूला पक्षी असणे हे चांगल्या परिसंस्थेचे द्योतक आहे. त्यामुळे पक्षी नष्ट झाले तर येणाऱ्या काळात माणवसृष्टीला धोका निर्माण होणार हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे. उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून बचाविण्याचा प्रयत्न करतो अगदी तसच पशु-पक्ष्यांचंही आहे.कडक उन्हाच्या चटक्यांनी पशु-पक्ष्यांनाही पाण्याची आवश्यकता भासते,अन्न व पाण्यासाठी ते भटकंती करतात, अनेकवेळा पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होतो.निसर्ग जपण्यासाठी पक्ष्यांनाही वाचविले आवश्यक असते.शक्यतो पक्ष्यांसाठी पाणी स्टीलच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात न ठेवता मातीच्या भांड्यात ठेवायला हवे.असे प्राणीमित्र अँड.प्रवीण तोतला यांच्यातर्फे सांगितले जात आहे.तर गरुड झेप फाऊंडेशन तर्फे “पक्षी बचाओ” अभियालाला सुरुवात करण्यात आली आहे.
गरुडझेप फाऊंडेशनचे गणेश गरूड यांनी श्री दत्त मंदिर येथे पशु-पक्षी यांच्याकरिता पाण्याची व धान्याची सोय करण्यात आली.मुक्या पशु-पक्षांसाठी प्रत्येकाने आपल्या घराबाहेर,गच्चीवर,अंगणात,कार्यालय परिसरात व झाडावर,शक्य होईल तेथे “ओंजळभर पाणी व मूठभर धान्य” ठेवून उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांना काही प्रमाणात दिलासा द्यावा असे अवाहन करण्यात येत आहे.दरम्यान पक्षांचे अस्तित्व टिकवीण्यासाठी ‘गरुडझेप फाऊंडेशनच्या’ वतीने शहरातील शाळा,महाविद्यालय,मंदिर, व विविध कॉलनीमध्ये पक्षासाठी ओंजळभर पाणी व मूठभर धान्य ठेवण्याचे काम हाती घेतले आहे असे यावेळी म्हणाले. या मोहिमेत वनपरिमंडळ अधिकारी तुकाराम डिगोळे,भीम सुरवसे, काशिनाथ राठोड, बालाजी मद्रे,सोमनाथ ढोले,रामेश्वर सुरवसे,अनिल सुर्यवंशी,प्रसाद सूर्यवंशी,प्रवीण कोराळे,शाहू बिराजदार आदी उपस्थित होते.
(सचिन बिद्री : उस्मानाबाद)