देवरा समीती व चेअरमन सुरेश बिराजदार यांची मंत्रालयात बैठक संपन्न

जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा .सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकहमी रकमे बाबत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी राज्याचे वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली देवरा समिती स्थापन करून अहवाल सादर करणे बाबत सूचित केले होते . सदर देवरा समिती समवेत दि .२२ रोजी मुंबई येथे आयोजित बैठकीत चेअरमन सुरेश बिराजदार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बँकेस कॉस्ट व फंडनुसार थकहमीची रक्कम देण्याचे मान्य केले आहे .या मिळणाऱ्या रकमेमुळे बँक पूर्व पदावर येण्यास मदत होणार आहे.


मागील काही काळापासून जिल्हा बँकेस थकहमीची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा .शरदचंद्र पवार , राज्याचे उपमुख्यमंत्री ना .अजित पवार, राज्याचे सहकार मंत्री ना . बाळासाहेब पाटील यांच्याकडे संपर्कात राहून पाठपुरावा चालू ठेवला होता . सदर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . पवार यांनी राज्याचे वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली देवरा समिती स्थापन करून अहवाल सादर करणे बाबत सूचित केले होते. सदर देवरा समिती समवेत मंत्रालय मुंबई येथे बँकेचे माजी चेअरमन व नवनिर्वाचीत सदस्य श्री . बिराजदार यांची बैठक पार पडली . सदर बैठकीमध्ये श्री . बिराजदार यांनी थकहमी मिळण्यासंदर्भात आवश्यक ती माहिती देऊन बँकेस थकहमीची रक्कम मिळणे कसे गरजेचे आहे याबाबत सवीस्तर माहीती विषद केली , त्यानंतर बँकेस कॉस्ट व फंड नुसार रक्कम देण्याचे समीतीने मान्य केले आहे.
ही थकहमी ची रक्कम बँकेस ३१ मार्च २०२२ अखेर पर्यंत मिळणार आहे . ही थकहमीची रक्कम बँकेस मिळणार असल्यामुळे बँकेला पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर गतवैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे. श्री . बिराजदार यांनी चेअरमन पदी विराजमान झाल्यानंतर बँकेस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने मागील चार ते पाच वर्षांपासून मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या परिश्रमाला, पाठपुराव्याला अखेर यश आले असून पुढील काही महिन्यांत बँक पूर्वपदावर येणार आहे . उस्मानाबाद जिल्हा बँकेस पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांबद्दल बँकेचे चेअरमन श्री. बिराजदार यांचे सभासद, ठेवीदार व कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत .या बैठकीसाठी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त श्री .शेखर गायकवाड, एम एस सी बँकेचे कार्यकारी संचालक
अजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

(सचिन बिद्री उस्मानाबाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *