हायस्कूल टीचर्स सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन..

उस्मानाबाद : उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व शिक्षक सभासदांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल सोसायटीच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम संस्थेचे माजी चेअरमन व माजी गटशिक्षणाधिकारी अंकुशराव बिराजदार, महंमदअली शेख,चंद्रशेखर सुरवसे, दिनकर कुलकर्णी, हणमंत शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन पद्माकर मोरे तर प्रमुख उपस्थिती मा.गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे ,शिक्षण समिती राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रदीप मदने, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी मसलगे,शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी बिराजदार, प्रवीण स्वामी, दिव्यांग शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबुराव पवार ,संघाचे तालुका कोषाध्यक्ष संजय खंडाळकर, केंद्रप्रमुख सुभाष चव्हाण ,आदर्श शिक्षक समितीचे विभागीय नेते शशिकांत डांगे,शिक्षक नेते विजय ओंवाडकर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष वैरागकर, नागोराव पाटील, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन पी.डी.सोमवंशी संजय चालुक्य व्हा.चेअरमन लक्ष्मण चव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळी अंकुश बिराजदार यांनी प्रतिकूल परिस्थितीत या संस्थेने काटकसरीने व्यवहार करून अल्पावधीतच जिल्ह्यातील एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे.आज संस्थेची भव्य इमारत उमरगा शहरात होत असल्याचे आम्हाला आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली. संस्थेचे चेअरमन पद्माकर मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की तालुक्यातील सर्व सभासदांना आजच्या काळात कमी वेळात एकरकमी 11 लाख रुपये ,मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये,सभासदाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्ज माफ करणे,एस एम एस सुविधा,आर डी वर 8 टक्के व्याज अशा विविध योजना संस्था देत असून यापुढेही सहकार क्षेत्रात सर्व बँका बाजारात उतरल्याने स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील व सभासदांना जास्तीत जास्त हक्काचे कर्ज उपलब्ध करून देणारी संस्था असेल. अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी विजयकुमार मुगळे, धनराज जाधव ,राहुल बावा, विजयकुमार वाघमोडे रघुराम वायकर शरद जगताप, संजय रुपाजी प्रवीण भोसले, अंगद थिटे, मनोज घोडके,हरी जाधव,शाम मुळे,दिलीप कलाल, सुनील पांचाळ, पुष्पलता पांढरे ,अरुणा वाघे ,माया बोरूळकर सुधावाणी कडगंचे महेश कडगंचे ,बालाजी कोकाटे ,शाहूराज माने ,व्यंकट सगर इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव तुकाराम कुंभार, संचालक बशीर शेख ,श्रीमंत जाधव, धनश्री दळवी, राम साळुंके नवाज शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हणमंत शिंदे,सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रवीण स्वामी तर आभार व्हा.चेअरमन लक्ष्मण चव्हाण यांनी मानले.

( सचिन बिद्री : उमरगा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *