मंत्री नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा-सिल्लोड तहसील कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने
औरंगाबाद : मुंबई बॉम्ब स्फोटाशी मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम शी आर्थिक सबंध असल्याकारणाने ED कडून अटक करण्यात आलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या करिता तहसील कार्यालय सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शन करण्यात आले
नवाब मलीक यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सात तास झाडाझडती घेतल्यानंतर अटक केल्याने कायद्याचे पालन करत असताना अटक झालेल्या व्यक्तीला मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही ,हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे यात कोणीही राजकारण म्हणून न बघता ईडी ने नियमानुसार कारवाई केली असून यात टेरर फंडिंग चा संबंध आहे मालिक अंडरवर्ल्डच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्याचे कारण काय..? मलिकांनी 55 लाख रुपये हसीना पारकरला दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली या वेळी माजी आमदार सांडू पा.लोखंडे,भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे,प्रदेश उपाध्यक्ष सुनिल मिरकर,व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा,मनोज अण्णा मोरेल्लु, प्रकाश भोजवानी,रघुनाथ पांडव,युवा शहराध्यक्ष अरुण राठोड,अर्षद पठाण, अनमोल ढाकरे,अतुल साळवे,अज्जू शहा, योगेश सोनवणे, स्वप्निलशिंगारे, अमोल कुलकर्णी ,योगेश पंडित आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.