औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दोन वर्षांपासुन कोरोनाच्या माहामारीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक बंद होती. परंतु या वर्षी प्रशासनाने थोडी शिथीलता दिल्याने शासनाचे नियम मोजक्या लोकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव म्हणून मिरवणूक काढण्यात आली.दि.१९/२/२२ शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्यांच्या जयंती निमित्त गावात रॅली काढून अभिवादन करण्यात आले. जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्राचार्य नारायणराव कोलते,उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, व अर्मी जवान सिग्नल मॕन अनिल बाबूराव नप्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून पुजन करण्यात आले.नंतर छत्रपती शिवरायांची आरती करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात मिरवणूक काढण्यात आली.महाराजांची मिरवणुक दुपारी मुख्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली


. मिरवणुकीच्या स्वगातासाठी रस्त्याची साफ सफाई करुन महिलांनी दारासमोर रांगोळी काढुन तोरणे पताका लावण्यात आलेल्या होत्या. मिरवणुकीत प्रत्येक समाज बांधवांनी सहभागी होऊन वेषभूषा परिधान करून डोक्यात फेटा बांधून हातात शिवाजी महाराज यांचे भगवे झेंडे घेऊन नाचत गाजत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करत होते. प्रत्येक चौकाचौकात छ. शिवाजी महाराज यांची महिलांनी आरती करून पुजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम सावळदबारा परिसरात व सोयगाव तालुक्यात व परिसरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी मिरवणुकीत शिवजयंती अध्यक्ष शुभम मोरे ,उप अध्यक्ष ओम चोपडे , पिंटु वरखड , गणेश खैरे , अरुन पंजाबी ( पुजारी ) सुनिल शिप्पलकर , पवन कुल्ली , मोहम्मद तालीब पहेलवान , रज्जु तडवी , आकाश गायकवाड ,अक्षय कोते , संजय राजपुत , उप सरपंच मोहम्मद आरीफ , दिपक मानकर , विशाल खडके , योगेश सोळंके , शांताराम खराटे , वासुदेव खडके , सखाराम कोते , संदिप सुर्यवंशी , संदिप कोलते , योगेश टिकारे, अरुन नप्ते , दिपक नप्ते , मयुर महाजन ,आंबादास सुर्यवंशी , भरत नप्ते , पोलीस पाटील विलास कुल्ली , गावातील पत्रकार , आणि गावकरी उपस्थित होते या प्रसंगी फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उप निरीक्षक रंजीत कासले यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा पोलीस चौकीचे बिटजमादार मिरखाँ तडवी, पो.काँ.रवींद्र बागूलकर यांनी चोख बंदोबस्त दिला होता.

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *