औरंगाबाद : सोयगाव रा.प.बसस्थानक परिसरात श्री. समर्थ फोटो चे संचालक महेश मानकर यांच्या मार्गदर्शनात मित्र मंडळाने उत्कृष्ट देखावा सादर करून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन महाराष्ट्रा चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शनिवारी जयंती साजरी करण्यात आली.
नवनिर्वाचित नगरसेविका सौ. संध्याताई मापारीं, सोयगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि सुदाम शिरसाठ, समाजसेवक दत्तुभाउ रोकडे, आदिंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरण दुमदुमले यावेळी परिसरात व्यवसायीक राम फूसे, किशोर मापारी, दीपक पाटील, राहुल मानकर, कदिर शहा,रामू सोहनी, दिलीप सुरडकर, विष्णु पंडित,सुनील गावंडे आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद