औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथील झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणी बुधवारी सोयगाव शेंदुर्णी ता.जामनेरच्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारावरून तपास लावून घरफोडी प्रकरणातील चौघांना जळगाव जिल्ह्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.या प्रकरणी चौघांना शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता,त्यांना सोमवार पर्यंत दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ दिली आहे.या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून ९६ हजार पाचशे रु रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बुधवारी मध्यरात्री हिंगणे ता.जामनेर विजय प्रभाकर पाटील (वय ४७ रा.हिंगणे ता.जामनेर) ज्ञानेश्वर पंडित गोसावी या दोघांना तर हकीम दादामिया देशमुख(रा.कंडारी ता.जळगाव) आणि नलिनी कैलास देठे(रा.लोणवाडी ता.बोदवड हल्ली मुक्काम गलवाडा)या दोघांना असे चार आरोपी सोयगाव पोलिसांनी अटक केले होते.यामध्ये बहिणीनेच बहिणीच्या घरात रोकड रक्कम आणि सोने,चांदी पाहून घरफोडीचा कट आखल्याचे पोलिसांना निष्पन्न झाल्यावरून खळबळ उडाली होती.यातील नलिनी कैलास जेठे हि फिर्यादी महिला सरलाबाई निकम हिची सग्गी बहिण आहे. सोयगाव शहराच्या जवळच असलेल्या गलवाडा ता.सोयगाव येथील सरलाबाई ईश्वर निकम यांच्या घरात दि.२७ जानेवारीला भरदिवसा घरात घुसून धाडसी घरफोडी करून घरातील पाच लक्ष तीस हजार रोकड,२० हजार रु.चे सोने,दहा हजाराची चांदी असा एकूण पाच लक्ष साठ हजाराचा मुद्देमाल या चौघांनी पळविला होता.याप्रकरणी सरलाबाई निकम यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात घरफोडीहा गुन्हा अज्ञातांच्या विरोधात दाखल करण्यात आल्यावर सोयगाव पोलिसांनी आठवडाभरातच तपास चक्रे फिरवून अखेरीस या घरफोडीचा छडा लावला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,उपनिरीक्षक भरत पाचोळे,जमादार राजू बर्डे,रवी तायडे,सागर गायकवाड,ज्ञानेश्वर सरटाळे,गणेश रोकडे,दीपक भंगाळे,अजय कोळी,कविता कांदे आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे,

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *