जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोनाचा इशारा…
औरंगाबाद : वाळुज महानगर परिसरातील गट नं 9 साईनगर , गुरुकृपा हौ. सोसायटी या ठिकाणी मागील दोन दिवसांपासून रोहित्र जळाल्याने नागरिकांना अंधाराचा व गैरसायीचा सामना सहन करावा लागत आहे. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर चालू असताना लाईट नाही अभ्यास कसा करावा परीक्षेत उत्तीर्ण कसे व्हावे हा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळूज महानगर चे अध्यक्ष उमेश दुधाट यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन उकंडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी नागरिकांच्या वतीने उमेश पाटील यांनी रोहित्राची क्षमता वाढवून देण्यात यावी व खराब झालेले रोहित्र तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे ही प्रमुख मागणी केली. येत्या दोन चार दिवसांत जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर महावितरण ऑफिस समोर हजारोंच्या संख्येने गट नबर मधील नागरिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा या वेळी देण्यात आला.
यावेळी नारायण गाडे, बाळू जाधव, राजेंद्र मगर, साधू प्रताळे ,संतोष कलमे, सतीश बेद्रे, अशोक अकोलकर, योगेश खोसे, मारुती तेजनकर, कृष्णा कोल्हे, योगेश मते, बोरसरे पाटील,माळेकर पाटील, गोकुळ वैध, आजीनाथ वैध, सुरेश कोकाटे, विष्णु क्षीरसागर, नितेश कानरे, वाडेकर पाटील, रुपेश जाधव, बाळू जाधव उबाळे यांची उपस्थिती होती.