औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी व परिसरात वादळी वाऱ्यामुळे गट क्रमांक 215 मधील रामेश्वर नलावडे यांच्या शेतात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे व परीसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाऱ्या मुळे आडवे झाले यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने परिसरात गव्हाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे त्यात गव्हाचे पीकही यंदा जोमात आले आहे तरी गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आणि वादळी वारे सुटत असल्याने शेतकऱ्याची एकच धावपळ सुरू झाली आहे या वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक मात्र आडवे झाले आहे
शेतकऱ्यांवर एकामागे एक आस्मानी संकटे येतच आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी ओला दुष्काळ मुळे अनेक शेतकऱ्यांचे जमिनी पाण्यात तुळुंब झाल्या होत्या अनेकांची पिके पाण्यानेखराब झाली होती वातावरण दुरुस्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू , हरबरा , कांदा व इतर पीके पेरणी केली शेतकरी दिवस रात्र एक करून या शेतात पीक पीकवतो मात्र शेतकऱ्याच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आणि असे म्हटले जाईल निसर्गाला हे मान्य नव्हतं त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला व बाजार सावंगी येथे व परिसरात पाऊस पडल्याने शेतकऱ्याच्या तोंडातील घास पुन्हा एकदा हिरावला गेला शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी पीके पाण्यात तुंबलेले आहे शेतकरी त्याचे कष्टाने पिकवलेल्या पिकाचे नुकसान तो त्याच्या डोळ्याने पाहत आहे या वातावरणामुळे गहू,हरभरा,मका सोयाबीन आदी पिके हातातून जातात की काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे निसर्गाचे नियम आपले शेतकरी तरी काय करणार शेतकऱ्यासाठी सरकारने काही द्या काही उपाययोजना सुरू कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे