औरंगाबाद : सोयगाव तालुक्यामधे अनेक ठीकाणी महा ई सेवा केंद्र चालक जनतेची चांगलीच बिनधास्त लुट करत आहे तहसील चे रहिवासी , असो की उत्पन्नाचे प्रमाण पत्र कीवा शेतकरी असल्याचे प्रमाण पत्र असो या प्रमाण पत्राचे प्रत्येकी २०० ते , २५० रुपये आकारण्यात येत आहे शासनाची फी तर ३३ रुपये ५० पैसे आहे मग महा ई सेवा सुविधा केंद्र चालवनारे २०० ते २५० रुपये का घेतात यामुळे जनतेच आणि सर्व सामान्य व्यक्तींच्या खिशाला झळ बसुन फार मोठे नुकसान होत आहे याला तहसील महसुल विभाग कधी आळा घालणार ? सध्या न्युक्लीयस बजेट मधुन आदिवासी समाजासाठी जातीचे प्रमाण पत्र काढण्यासाठी कीवा इतर योजने साठी लागनारे उत्पन्नाचे प्रमाण पत्र कीवा तहसील चे रहिवासी असो या कागत पत्रांसाठी २०० ते , २५० रुपये घेतल्या जात आहे या गोरगरीब आदिवासी समाजाकडे वेळेवरती येवढे पैसे नसल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंब हे अनेक योजने पासुन वंचित राहत आहे
या साठी सोयगाव तहसील विभागाने कुठतरी आळा घातला पाहीजे गोरगरीब आदिवासी , आणि सर्वसामान्य जनतेची अडवनुक पीळवनुक करुन जो गैर प्रकार होत आहे तो कुठतरी थांबायला पाहीजे हा गैर प्रकार थांबविण्या साठी महसुल विभागाने प्रत्येक प्रमाण पत्राची पावती देण्याची सक्ती करुन आदेश दिले तर ही लुट ,गैर प्रकार कुठंतरी थांबेल कोनकोनत्या प्रमाण पत्रा साठी कीती फी घेतली जाते त्याचे भाव फलक बोर्ड प्रत्येक दूकानामधे लावण्यासाठी सक्तीचे केल्यास हा गैर प्रकार आणि जनतेची लुट थांबु शकेल आणि सर्वांच्या लक्षात येईल अशी त्रस्त झालेली जनता आणि गोरगरीब आदिवासी समाजामधुन प्रतिक्रीया येत आहे सोयगाव महसुल विभाग या मनमाणी कारभाराकडे कधी लक्ष देनार ही मनमाणी लुट कधी थांबवनार
हा प्रश्न गोरगरीब सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे प्रत्येक प्रमाण पत्राची पावती देण्याचे महसुल विभागाने सक्तीचे केले तर ही लुट थांबेल आणि कोनत्या प्रमाण पत्राला एकुण कीती रक्कम द्यावी लागते याचे भावफलक बोर्ड लावण्यात आले तर नक्की हा गैर प्रकार थांबेल आणि जनतेला न्याय मिळेल असे सध्या जनतेतुन प्रतिक्रीया येत आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद