औरंगाबाद : मातोश्री फाउंडेशन महाराष्ट्र चित्रपट महामंडळ व मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या उल्लेखनीय त्यागमूर्ती महिलांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ बी.जी. गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘फास’ सिनेमाच्या लेखिका व निर्माता माहेश्वरी पाटील चाकूरकर, महाराष्ट्र चित्रपट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत होर्शीळ,अभिनेत्री अपेक्षा निर्मळ, हनुमान भोंडवे, बाप्पा दळवी ,जयश्री घाडगे, लक्ष्मण हिवाळे,श्रीराम पोतदार,उमेश डावखर, राधाकृष्ण बिघोत, समाधान हराळ, प्रसाद रोडगे हे होते.
याप्रसंगी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता समोर येण्याची गरज आहे, महिलांच्या विविध समस्यांवर भाष्य माहेश्वरी पाटील यांनी केले, तर शिवाजी घडवायचा असेल तर पहिला जिजाऊ चा जन्म झाला पाहिजे ,जिजाऊ होण्यासाठी महिला होणे गरजेचे आहे ,मातृत्व स्वीकारणे गरजेचे आहे, आम्ही फक्त महिलांचा गौरव केलेला नाही तर त्यागमूर्ती महिलांचा गौरव केला असे उदगार डॉ.बी.जी. गायकवाड यांनी केले.
महिला गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर कोडगिरे, जयश्री सोमासे ,गरुड मॅडम,भोसले मॅडम, जयश्री घाडगे,गौरी गोळे, भोकरे मॅडम, वाघमारे मॅडम ,तारा शिंदे, मिना शिंदे, गंगासागर गायकवाड मॅडम आदींना हा पुरस्कार सामाजिक,शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमासाठी अभिजीत पारधे, पूजा निकुम ,करिष्मा तनपुरे,स्वप्नील गायकवाड, सोनाली पत्तेवार, कोमल अग्रवाल,गजेंद्र हराळ, गौरव पारदे, गौरव मोरे आदींनी परिश्रम घेतले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुमार बिरदवडे यांनी तर आभार मातोश्री फौंडेशनच्या विद्यार्थी प्रतीक मानवते यांनी मानले.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400