उस्मानाबाद उमरगा-लोहारा तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात जवळपास 53 कोटी 53 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

विशेषतः जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या व सध्या दुरावस्थेत असलेल्या काही रस्त्यांच्या कामांसाठी विशेष बाब म्हणून आ. चौगुले यांनी निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून लोहारा तालुक्यातील१ )लोहारा नारंगवाडी रस्ता रामा -२३७ किमी २८/२०० (भाग-माकणी गावाजवळ) नळकांडी पुलाचे बांधकाम करणे ता.लोहारा – ८० लक्ष रु. २) सास्तूर उदतपुर सालेगाव कोराळ ते राममा ६५ मुरूम बेलंब आलुर रस्ता रामा – २४२ किमी ६९/०० ते ७०/०० (सालेगाव ते तालुका सरहद्द) ची सुधारणा करणे ता.लोहारा – १ कोटी.
३) रामा २११ ते जेवळी धानुरी माकणी ते जिल्हा सरहद्द रस्ता प्रजिमा ४५ किमी १३/०० ते १३/८०० (भाग-माकणी चौक) मध्ये कोन्क्रीट रस्ता व गटार बांधकाम करणे – २ कोटी ८५ लक्ष रु.
४) रामा २११ ते जेवळी धानुरी माकणी ते जिल्हा सरहद्द रस्ता प्रजिमा ४५ किमी १४/०० ते १७/२०० (भाग – माकणी ते जिल्हा सरहद्द) ची सुधारणा करणे – १ कोटी २३ लक्ष रु५) होळी कोंडजीगड करवंजी सुपतगाव येणेगूर ते रा.म.मा.९ ते येणेगूरवाडी ते सुंदरवाडी राममा-२४२ रस्ता इजीमा – १०३ किमी ०/०० ते १५/०० चि सुधारणा करणे. – २ कोटी ३७ लक्ष रु.६) रा.मा.२११ ते मोघा बु. ते वडगाववाडी रस्ता इजीमा-९८ किमी ०/०० ते १२/०० ची सुधारणा करणे – १ कोटी ९० लक्ष रु. व उमरगा तालुक्यातील
१) सास्तूर उदतपुर सालेगाव कोराळ ते राममा ६५ मुरूम बेलंब आलुर रस्ता रामा – २४२ किमी ७३/५०० ते ७७/०० (कोराळ ते मुरूम मोड) चि सुधारणा करणे – २ कोटी रु.२)मुळज तुरोरी राममा ६५ गुंजोटी भुसणी मुरूम आष्टा का. रस्ता रामा २४० किमी ७०/२५० ते ७०/७५० व ८४/८०० ते ८८/४०० (भाग – गुंजोटी गाव ते रामा-२३९ जंक्शन) चि सुधारणा करणे :- ४ कोटी रु. ३) मुळज तुरोरी राममा ६५ गुंजोटी भुसणी मुरूम आष्टा का. रस्ता रामा २४० किमी ९०/२०० ते १०३/५०० (भाग-लक्ष्मी मंदिर ते आष्टा का. रस्ता) चि सुधारणा करणे – ५ कोटी रु.
४)रामा 239 रस्ता औराद पाटी ते राज्य सरहद्द ची सुधारणा करणे – ११ कोटी रु. ५)रा.मा.२११ धानोरी हराळी तोरंबा कलदेव निम्बाला समुद्राळ होळी रस्ता प्रजिमा-४४ किमी १६/०० ते १८/२०० व २२/५०० ते २५/०० (भाग- तालुका सरहद्द ते कलदेव निम्बाला) चि सुधारणा करणे – २ कोटी ८५ लक्ष रु. ६) राममा ६५ ते काळा निम्बाला कडदोरा व्हंताळ एकुरगा ते रामा-२३९ प्रजिमा ४७ किमी १/५०० ते ७/५०० (डाळिंब ते काळा निम्बाला) चि सुधारणा करणे – ३ कोटी ८० लक्ष रु.७)राममा ६५ ते काळा निम्बाला कडदोरा व्हंताळ एकुरगा ते रामा-२३९ प्रजिमा ४७ किमी ११/०० ते १९/५०० (भाग-कडदोरा ते लक्ष्मी पाटी) ची सुधारणा करणे – ५ कोटी ७० लक्ष रु.
८)उमरगा राममा ९ (६५) ते एकोंडी पळसगाव नागराळ रस्ता इजीमा – ११५ किमी ०/०० ते ११/०० ची सुधारणा करणे. – १ कोटी ९० लक्ष रु.
९)एकोंडी ते प्रजिमा-५१ चिंचोली मळगी रस्ता ग्रामा-७० किमी ०/०० ते ५/०० ची सुधारणा करणे – १ कोटी ४२ लक्ष रु. १०)एकोंडी ते प्रजिमा-५१ चिंचोली मळगी रस्ता ग्रामा-७० किमी ३/५०० मधील पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी ४२ लक्ष रु.
११) रामा २४२ ते बेलंब केसरजवळगा ते जिल्हा सरहद्द रस्ता इजीमा १२३ चि सुधारणा करणे – ०/०० ते ७/०० – १ कोटी ४२ लक्ष रु. १२) राममा ९ ते कराळी हन्द्राळ रस्ता ग्रा.मा.८० किमी ०/०० ते ५/०० चि सुधारणा करणे – ९५ लक्ष रु. १३) गुंजोटी गुंजोटीवाडी ते रामा २३९ रस्ता ग्रामा-६४ किमी ०/०० ते ६/०० चि सुधारणा करणे – १ कोटी ९० लक्ष रु.
आदी विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
प्रतिंनिधी, सचिन बिद्री