(सचिन बिद्री)
उस्मानाबाद : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या आदेशाने औरंगाबाद येथे शहरातील वाळूज एम आय डी सी परिसरातील उच्च न्यायालयाने प्रमाणित केलेल्या जागेवर शिवा सिद्धेश्वर मंदिराजवळ नव्याने स्थापन केलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याची विटंबना केलेल्या नराधमास ‘कैलास भोकरे’या गावगुंडास कडक कारवाई करण्यासाठी उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांना उमरगा शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या वेळी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मल्लिनाथ कारभारी,उमरगा तालुका अध्यक्ष अमर दत्तात्रय वाले,उमरगा तालुका उपाध्यक्ष रमेश गुंजोटे,तालुका संघटक,अमर स्वामी,ऍड एस वाय बिराजदार,सुधाकर दामशेट्टी,योगीराज स्वामी,मल्लिनाथ व्हनाळे,सागर पाटील,म्हताब तांबोळी,शेषेराव पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते