डायल112,100,स्थानिक पोलिस स्टेशनशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची मदत घ्यावी

पुणे : आज बारामती निर्भया पथकाने माननीय डी वाय एस पी श्री गणेश इंगळे साहेबांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अमृता भोईटे मॅडम यांनी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथील सीनियर कॉलेज ला भेट देऊन पुणे विद्यापीठाच्या निर्भय कन्या अभियाना अंतर्गत आयोजित निर्भय कन्या व्याख्यानमाला या कार्यक्रमास उपस्थित राहून सिनियर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना महिलांविषयक कायदे,निर्भया पथक म्हणजे काय निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये निर्भया पथक कशा पद्धतीने कार्य करते, वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याचे अत्याचारास बळी पडू नका याची पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची उदाहरणांसहित माहिती दिली तसेच तक्रार कोठे व कशी द्यावी,न घाबरता व्यक्त व्हावे,अन्याय सहन न करता प्रतिकार करावा तसेच मुली व महिलांची सुरक्षितता याबाबत निर्भया पथक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परंतु नैराश्यात जाऊन जीवन संपून नका जीवन एवढे स्वस्त नाही की ते आपण कोणासाठी तरी संपवावे आई-वडिलांचा गुरुवार्यांचा यांचा आदर करणे समोर योग्य ते ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे वाईट मार्गाला न जाता चांगली संगत धरणे अशा वेगवेगळ्या विषयांवर ती मार्गदर्शन केले व पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची उदाहरणांसहित माहिती दिली डायल112,100,स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची जास्तीत जास्त मदत घ्यावी असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मुरूमकर निर्भया पथकाच्या सौ.अमृता भोईटे सीनियर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉक्टर सीमा गोसावी प्राध्यापक डॉक्टर भगवान माळी प्राध्यापिका डॉक्टर माधुरी पाटील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *