पुणे : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथुन धक्कादायक बातमी येतीय. कुसेगाव चाच उपसरपंचानेच ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे..अमोल गणेश शितोळे असे या उपसरपंचाचे नाव आहे.
.एवढंच नव्हे तर मी गावचा उपसरपंच आहे..तू काय पण कर,असे म्हणत महिलेला शिवीगाळ केली आहे.

मंगळवार (दि.२४) रोजी कुसेगाव मधील गट न.६९ आणि ७०च्या बांधावर तलाठी गबाले हे स्थळपाहणी करून पंचनामा गेल्या नंतर दत्तात्रय शितोळे यांनी आम्हाला पंचनामा तुमच्या बाजूने करून घेता काय असे म्हणत महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करीत साडी ओढून छातीवर मारहाण केली तसेच अमोल गणेश शितोळे याने मी गावचा उपसरपंच आहे,तू काय पण कर असे म्हणून शिवीगाळ केली असल्याची तक्रार या पीडित महिलेने पाटस पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे…यामुळे उपसरपंचाचे मानसिक संतुलन बिघडले की काय? अशी चर्चा आता कुसेगाव मध्ये रंगू लागली आहे..या दोघां आरोपींविरुद्ध भा. द. वी.क. ३५४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.