सोलापूर : मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पारधी आदिवासी समाजाच्या गरजू मुलांना कपडे वाटप व पाडव्याची गोड घाटी वाटप करून डॉ उषा भोईटे पवार व नंदकुमार पवार या दोघा उभयतांनी एक नवा आदर्श घालून दिला. नंदकुमार पवार हे आदिवासी आश्रमशाळा मौजे.सवत गव्हाण या ठिकाणी कार्यरत आहेत़.आज या पारधी समाजाच्या मुलांचा सण गोड करावा म्हणून मायलेकी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आज हा कार्यक्रम करण्यात आला. पारधी समाजाची कित्येक मुलं ही आई बापा विना आहेत़; अशा मुलांना आज खऱ्या अर्थाने गरज आहे. अशा गरजू मुलांची गरज म्हणून डॉ. उषा भोईटे व नंदकुमार पवार यांनी हा स्तुत्य उपक्रम केला.

यावेळी मुलांचा आनंद आणि उत्साह खूप वेगळाच होता. कायमच गरजू लोकांसाठीच मायलेकी संस्था काम करत आहे आणि करत राहील असे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले.या कामात कायमच डॉ. उषा पवार व कन्या साक्षी व मुग्धा पवार यांची मोलाची साथ असते असेही पवार म्हणाले. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने कायमच असे लहान मोठे उपक्रम आम्ही करत असतो. घरातील सर्वानाच सामाजिक कार्याची आवड असल्याने हे सुचते व सहज शक्य होते, असे मत पवार दाम्पत्यानी यावेळी व्यक्त केले.
प्रतिनिधी,
मोहसिन शेख
एन.टी.व्ही न्यूज मराठी माळशिरस (सोलापूर)