भिंती झाल्या खिळखिळ,कार्यालयात वारूळाचे ढीग,विंचू अन् सापांचा वावर.
उस्मानाबाद : उमरगा शहरातील दत्त मंदिर मागील परिसरात विविध प्रशासकीय कार्यालये आहेत, बर्याच कार्यालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यापैकी दुय्यम निबंधक कार्यालयाला नव्या सुंदर स्वरूपात आणण्यास काही सामाजिक संस्थां-संघटनेच्या सहकार्याने बांधणी झाली असून सुंदर बनले तर राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात नव्याने रुजू झालेले अधिकारी सुखदेव सिद्ध यांनी स्वखर्चातून रंगरंगोटी व डागडुगी केल्याने त्यांच्या कार्यालयाची स्वच्छता व सुंदरता उजळून आली पण या कार्यालयाच्या शेजारीच असलेले सहकारी संस्था व सावकारांचे निबंधक कार्यालयाची दुरवस्था अद्याप जशास तशी आहे.

या कार्यालयात काही ठिकाणी अक्षरशः वारुळे दिसून येतात तर छताचा काही भाग खाली पडत असतो.अश्या धोकादायक परिस्थितीतही येथील अधिकारी अन् कर्मचारी जीव मुठीत घेऊन सेवा देताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी एन टी व्ही न्युज मराठी वृत्तवाहिनी व दै. गुरुधर्मच्या वतीने येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या बदललेले स्वरूप पाहता संबंधित अधीकारीचे कौतुक करीत प्रोत्साहनपर डॉ बाबासाहेबांची प्रतिमा भेट दिली होती.यावर तालुक्याचे शिवसेना जेष्ठ नेते तथा किल्लारी स. साखर कारखान्याचे चेअरमन केशव उर्फ बाबा पाटील यांनी दि ८ एप्रिल रोजी येथील सर्व कार्यालयाची पाहणी केली व जेंव्हा येथील सहकारी संस्था व सावकारांचे निबंधक कार्यालयाला भेट दिली तेंव्हा आवाक झाले. श्री बाबा पाटील यांनी तत्परतेने यासंबंधी अधिक माहिती घेतली व लागलीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. तत्परतेने या कार्यालयाची दुरुस्ती करून द्यावी अश्या सूचना केल्या.
(सचिन बिद्री : उमरगा)