उस्मानाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमरगा लोहारा तालुका विधानसभा अध्यक्ष शाहूराज लक्ष्मणराव माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे तालुक्यातील मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमरगा व लोहारा तालुक्यात शहरी भागात मशिदीवरती अनाधिकृतपणे भोंगे लावून मुस्लीम समाजाकडून मोठमोठया आवाजात आजान वाजवली जाते. त्यामुळे भोंग्याच्या कर्णकश आवाजामुळे परिसरातील नागरीकांना त्रास होत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मशिदीवरील अनाधिकृत भोंगे तात्काळ उतरवावे असे आदेश असतानाही संबंधीत भोंगे उतरविले जात नाहीत. याची तात्काळ दखल घेवून आपल्या स्तरावरुन असे सर्व मशिदीवरील सर्व भोंगे चार दिवसाच्या आत बंद करावेत.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमरगा/लोहारा तालुका च्या वतीने प्रत्येक मशिदजवळ हनुमान चालीसा लावून भोंगे वाजविण्यात येतील याची नोंद घ्यावी. आणि होणा-या परिणामास आपण स्वत: जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसे विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने यांच्यासह विवेक बनसोडे,संजय माने पाटील,विजय कांबळे,अप्पराव गव्हाणे,बाबा जाधव,विजयकुमार गुरव,खंडू जमादार,बाळासाहेब माने,लक्ष्मण लवटे,सहदेव यमगर,हिराजी दासीमे,किशोर माने,वामन जाधव,रवी पाटील,सिद्धेश्वर बिराजदार आदी पदाधिकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत
(सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद)