उस्मानाबाद : (सचिन बिद्री, मुरूम-उमरगा) : अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील थोर समाजसुधारक होते. मंगळवारी (ता.३) रोजी अक्षय तृतीय तिथीनुसार मुरूम शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात बसव प्रतिष्ठाणच्या वतीने अखिल भारतीय सामाजिक संघटनेमार्फत पूर्णाकृती पुतळ्याचे स्थापना करण्यात आली. उमरगा तालुक्याचे शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा, उद्योजक प्रशांत मुदकण्णा यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, खंडू धुम्मा, अमित ढंगे, गोपाळ इंगोले,कल्लू येवले, सुनिल ख्याडे, हुग्गे, सुभाष इकळगे, डिंगबर सोनटक्के, प्रकाश कंटेकुरे,शिवराज पुराणे आदिंच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त एक दिवशीय पुतळा प्रतिष्ठापना करण्यात आली. ता. १७ मे रोजी राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांची श्रीशैल, उज्जैन, काशी या त्रिपिठाच्या संचालकपदी व शरणजी पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही या समारंभात सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन मुरूम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *