आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांना यश

(सचिन बिद्री:उमरगा)

उस्मानाबाद : ग्रामीण रुग्णालय सास्तूर (स्पर्श) ता.लोहारा जि.उस्मानाबाद येथील ३० खाटांचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आल्याचा शासन निर्णय दि.२७/०४/२०२२ रोजी निर्गमित झाला असून गेली २० वर्ष ग्रामीण रुग्णालय सास्तुरने आपल्या आरोग्य सेवेचा वेगळा ‘स्पर्श पँटर्ण’ निर्माण केला आहे. दर्जेदार, तत्पर व तळमळीच्या आरोग्य सेवा पुरविताना गेल्या २० वर्षात सव्वा कोटीच्या वर रुग्णांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. तसेच अंतररुग्ण विभागात सातत्यपूर्ण Bed Occupancy Ratio १५० टक्केच्या वर राहिला आहे.


प्रसूती पश्चात कक्ष्या मध्ये मोठ्या प्रमाणत बाळंतपणे व अतिजोखमीच्या सिझेरियन शस्त्रक्रिया होतात. जनरल शस्त्रक्रिया मध्ये हि तीन चार पटीने वाढ झाली आहे. सातत्यपूर्ण व दर्जेदार आरोग्य सेवेमुळे रुग्णांचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे सतत कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला होता. रुग्णालयात येणारे रुग्ण याच्या तुलनेत तेथील तज्ञां डॉक्टरांची व इतर तंत्रज्ञांची संख्या फार कमी होती. तेंव्हा या रुग्णालयाचा कारभार अत्यंत सुव्यवस्थित व नियोजनबद्ध पाठद्धतीने हाताळणारे समन्वयक श्री रमाकांत जोशी यांनी सादर बाब आ ज्ञानराज चौगुले यांच्या निदर्शनास आणून दिली.याची दखल घेऊन आ चौगुले यांनी जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद, उपसंचालक लातूर यांच्या समवेत ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्श येथे प्रतक्ष भेट देऊन आढावा घेतला व श्रेणीवर्धनाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवन्याच्या सूचना केल्या.
उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास सादर करण्यासाठी प्रयत्न झाला. जवळपास मागील १ वर्षापासून आमदार श्री चौगुले यांनी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला व मतदार संघातील व परिसरातील गोर गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी या भावनेतून त्यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व मुख्यमंत्री कार्यालाकडे सतत पाठपुरावा केला. सदरच्या प्रश्नांबाबत त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न मांडून मा. मुख्यमंत्री व मा आरोग्य मंत्री यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली त्यामुळे प्रस्ताव मंजूरीच्या देशेने गतिमान झाला व अखेर दि. २७/०४/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा श्रेणीवर्धनाचा शासन आदेश निर्गमित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *