गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील भोळीभाबळी जनता लहान लहान कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास न देता त्यांच्याशी प्रेमाने व सहकार्याने वागून त्यांच्या हितासाठी प्रथम प्राधान्य देऊन काम करावे असे निर्देश अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भामरागड येथे आयोजित पंचायत समितीच्या आम सभेमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून आमसभा झालीच नाही.त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे झाले नव्हते.याउध्देशाने 4/०५/२०२२ ला वार्षिक आमसभा घेतल्या जात असल्याचे आमदार महोदयांनी विकासकामांचा आढावा समुह निवासी शाळेच्या पटांगणावर झालेल्या वार्षिक आमसभेचे अध्यक्ष स्थानी आमदार धर्मरावबाबा आत्राम बोलत होते.

यावेळी मंचावर जिल्हा नियोजन समिती सदस्य तुराज हलगेकर,हर्षवर्धनबाबा आत्राम,जेष्ठ रा.कॉं. कार्यकर्ते अरुण मुक्कावार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, तहसीलदार अनमोल कांबळे, संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदुम,न.प.मुख्याधिकारी डॉ.सूरज जाधव,माजी पं.स.सभापती गोईताई कोंडापे,माजी पं.स.सदस्य इंदरशाह मडावी,माजी पं.स.सदस्य प्रेमिला कुडयामी,रा.कॉ.तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार,रा.कॉ.शहर अध्यक्ष रमेश बोल्लमपल्लीवार,आदीवासीसेक सब्बरबेग मोगल,माजी उपसरपंच आसिफभाई सुफी,आरेवाडाचे सरपंच तानू सडमेक,जेष्ठ रा.कॉ.कार्यकर्ते रामजी भांडेकर इत्यादी उपस्थित होते.
सदर आमेसभेत बाल विकास अधिकारी राहुल चव्हाण,गट शिक्षणाधिकारी जनार्धन वडलकोंडा,तालुका वैद्यकीय अधिकारी मिलिंद मेश्राम,क्रुषी अधिकारी अमोल नेटके,प्राचार्य रतन दुर्गे, पो.उपनिरीक्षक दिपक कुंभारे,पं.स प्रशासकीय अधिकारी सतीश झाडे,शेरकुरे साहेब ,पंचायत विस्तार अधिकारी देव्हारे,आदी तालुका स्थरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वार्षिक आमसभेत महसूल विभाग , पंचायतसमिती,नगरपंचायत,कृषी,आरोग्य,शिक्षण, बालविकास इत्यादी विभागांतर्गत किती विकास कामे झालेत व किती प्रलंबित आहेत.पुढील आर्थिकवर्षात विकासकामांची काय तरतूद केली इत्यादींचा आढावा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला.यावेळी बरोबर माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणीही केली.गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात सर्व रिक्त पदांची माहिती घेतली. आरोग्य सेविका म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या स्थानिक मुलींनाच प्रथम संधी द्या.अंगणवाडी सेविका,मदतनिस व आशावर्करचे रिक्त पदे तात्काळ भरण्याचे निर्देश आमदार आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नगरपंचायत भामरागड अंतर्गत नळयोजना तात्काळ सुरू करा.आदिवासी व गैरआदिवासींना वनहक्क जमिन पट्ट्याने प्रस्ताव ताबडतोब तयार करुन मार्गी लावा. पुलांमुळे ज्याचे नुकसान होणार आहे त्यांना जागा उपलब्धतेसाठी प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर पाठपुरावा करा.या तिन्ही कामांना प्राथमिकता द्या. असे निर्देश आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपस्थित लोकांनी अनेक समस्या मांडल्या त्यांचे निराकरण तात्काळ करण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांनी केले.संचालन विनित पद्मावार यांनी तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख पुसलवार यांनी मानले.आमसभेत तालुक्यातील बहुसंख्य जनता उपस्थित होती.
सुरेश मोतकुरवार अहेरी/गडचिरोली