सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढा..!
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आज दिनांक5/5/2022 ला सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या करिता माननीय संवर्ग विकास अधिकारी प. समिती अहेरी यांना निवेदन देण्यात आले.
त्या समस्यात सातव्या वेतन आयोगानुसार पहिला व दुसरा हप्ता मिळणे शिक्षकांचे जीपीओ बुक अद्यावत करणे कुटुंब वेतन धारकाचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते मिळणे80 वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना दहा टक्के वेतनात वाढ करून देणे सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला मिळणे प्रवास भत्ता अदा करणे इत्यादी समस्यांच्या निराकरणासाठी आज5/5/22 रोजी सेवानिवृत्त शिक्षक संघटना शाखा अहेरीच्या वतीने अध्यक्ष श्री नानाजी जाकोजवार उपाध्यक्ष एबी पुसा लवार कार्याध्यक्ष श्री मधुकर उर्फ बबलू सडमेक सचिव एचएम अलोने सहसचिव ए. एस. निकुरे कोषाध्यक्ष यु आर मोटकूरवार डी ए अली पी एस गुरु. डीआर नंदगिरवार डी आर चातारे बी एल सडमेक उपस्थित होते माननीयसंवर्ग विकास अधिकारी श्री चन्नावार साहेब यांनी समस्याचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले साहेबांचे आभार मानून चर्चा समाप्त करण्यात आली