आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारी बसविला आळा

वाशिम : मा. श्री बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर
प्रतिबंधात्मक कारवाई करन गुन्हेगारी आळा बसविला असुन अधिकाअधिक कारवाई करुन पोलीसांचा खाक्या नमुद आरोपीना दाखविला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रिसोड येथील अभिलेखावरील शरीराविरुध्द तसेच जनमानसात भिती निर्माण करन खडणी वसुल करणे, छोटया छोटया कारणावरुन भांडण करुन गावात टोळीने राहुन सर्व सामान्य लोकांना मारहाण करणे,महिला मुलींची छेड छाड करणे अशा प्रकारचे गुन्हे करणान्या बंडु मारोती शेजुळ व विजय ऊर्फ बबलु दिनकर तायडे रिसोड यांना २ वर्षाकरीता वाशीम जिल्हयातुन तडीपार आदेश निर्गमीत केल आहे.


वाशिम जिल्हयातील रिसोड शहरातील १) बंडु मारोती शेजुळ रा भोकरखेडा रोड रिसोड ता रिसोड जि वाशिम
२) विजय उर्फ बबलु दिनकर तायडे रा आंबेडकर नगर रिसोड ता रिसोड जि वाशिम यांचे विरुध्द शरीराविरुध्द तसेच जनमानसात भिती निर्माण करुन खडणी वसुल करणे, छोटया छोटया कारणावरुन भांडण करुन गावात टोळीने राहुन सर्व सामन्य लोकाना मारहाण करणे, महिला मुलींची छेड छाड करणे अशा प्रकारचे गुन्हे करणारे असुन त्यांचेविरुध्द पो. स्टे.रिसोड येथील शरीराविरुध्द ,खंडणी सारख्या गुन्हे. महिला मुलींची छेड छाड करणे अशा प्रकारचे गुन्हे करणाच्या त्यांच्या कृत्यावर वेळीच आळा बसावा म्हणुन त्यांच्यावर मुबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन सादर करण्यात आला त्या तडीपार प्रस्तावात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेल्या शिफारशी वरुन मा. श्री.बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हयात मुबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये वरील ०२ गुन्हेगारांना वाशिम जिल्हयातून एक वर्षा करीता तडीपार करण्याचे आदेश .
निर्गमीत केले आहेत.तसेच यापुढे ही वाशिम जिल्हयातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर व ज्या गुन्हेगारांवर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे अशा गुन्हेगारांची अध्यावत यादी तयार करुन त्यावर सुध्दा लवकरात लवकर, तडीपार,एम पी डी ए व मकोका कायदया अंतर्गत उच्चप्रतीची प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.मा. श्री.बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हा वाशीयांना असे आवाहन केले आहे
की, वाशिम जिल्हयात गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक बसणे गरजेचे असुन, अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्ती गुन्हेगारांना मदत करणारे इतर गुन्हेगार यांचे वर्तणुकीत बदल न झाल्यास अशा गुन्हेगार / टोळीवर अशाच प्रकारची प्रभावी व कठोर कारवाई करण्यता येईल, त्या अनुषंगाने वाशिम जिल्हयातील सर्व कियाशिल
गुन्हेगारांवर श्री बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम, श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांचे नेतृत्वात जनतेच्या सुरक्षिततेसाठी संपुर्ण वाशिम पोलीस कटीबध्द आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *