सोलापूर : मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या सिल्लोड तालुका सल्लागार पदी ॲड अनिस अहमद यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे मीडिया प्रमुख सलमान शेख यांनी मुख्य कार्यालय माळशिरस येथून केली आहे.

विधी अभ्यासक ,विचारवंत व त्यांचा सर्व समाजात असणारा दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांची समन्वय समितीकडून निवड झाली आहे. मुस्लिम समाजात आर्थिक दुर्बलता,शैक्षणिक मागासपणा मोठ्या प्रमाणात असून भविष्यात युवकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ॲड.अहमद यांनी आपले मत व्यक्त केले. या निवडीमुळे सिल्लोड तालुका व शहरातील राजकिय,सामाजिक संघटना व बार कौन्सिल सह मित्र परिवारांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रतिनिधी
मोहसिन शेख
एन.टी.व्ही.न्यूज मराठी माळशिरस (सोलापूर)
मो.7387531075
