औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकरी राजाच्या पेरणीची तयारी लगबग सुरू झाली आहे त्यासाठी विविध प्रकारचे बियाणे ,खते यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी हैराण आहे तेव्हा कृषी विभागाच्या माध्यमातून घरगुती बियाणे वापरावे यासाठी उगम क्षमता चाचणी घेण्यात आली .

त्यासाठी सोयाबीन बियाणे उगम चाचणी प्रात्यक्षिक करण्यात आली तेव्हा ३३५ व फुले संगम बियाणे यांच्या बियांवर चाचणी घेण्यात आली शिवापा पंधडे यांच्या शेतातील त्यांच्या घरील बियाणेआणून १० सोयाबीन बी घ्याचे व त्यांचे १०० दाणे १० सरळ व उभ्या रेषेत घरातील पोत्यावर घेहून त्यावर हळूहळू पाणी ३ वेळेस शिंपडावे व ४ दिवसानंतर पाहावे व ७० टक्के उगम झालेलं बियाणे वापरावे व एकरी ३० किलो बियाणे वापरावे जेणेकरून सोयाबिन उत्पन्न चांगले होऊ शकते अशी माहिती कृषी सहाय्यक एम, आर, भोळे व अर्जुन सुरडकर यांनी अशी माहिती सांगीतली

सावळदबारा येथे साई कृषी केंद्र सावळदबारा, अंशु ठाकूर यांच्या विद्यमाने व ग्रामपंचायत सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली यावेळेस गावातील राहुल टीकारे,ईश्वर काळे, समूह सहाय्यक मनोज बुढाळ, शिवाप्पा पंधडे, ,जीवन कोलते,मयूर महाजन,अंकुश राठोड, पत्रकार गोकुळ सिंग राजपुत , रहिम पठाण , आणि शेतकरी बांधव , व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद