औरंगाबाद : दर वर्षी सालाबाद प्रमाणे बुद्ध पौर्णिमा ,वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते असेच या वर्षी सुद्धा दिनांक १६ / ५ / २०२२ रोजी सायंकाळी ४ ते सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान वन्य प्रान्यांची गणना करण्यात आली

यावेळेस साठवण तलाव , पाझर तलाव या ठीकाणी गस्त घालुन अजिंठा वन विभाग वन परिमंडळ सावळदबारा येथील वन विभागाचे कर्मचारी अधीकारी यांच्याकडु हे निरीक्षण करण्यात आले या बुद्ध पौर्णिमा ला दिनांक १६ / ५ / २०२२ रोजी वन परिक्षेत्र अधीकारी एन , जे , सोनवणे अजिंठा यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गानुभव २०२२ निरीक्षण करण्यात आले यात सावळदबारा वन परिमंडळातील नियत क्षेत्र सावळदबारा , देव्हारी , टिटवी , पळसखेडा ,आणि मुर्ती या क्षेत्रामधे वन्य प्रान्यांची गणना सायंकाळी ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत च्या वेळेत ही गणना करण्यात आली

यात जंगलातील विवीध प्राणी दिसुन आले जसे निलगाय , हरिण , रानडुक्कर , ससा , मोर , रान मांजर , लांडगे , कोल्हे , हे वन्य प्राणी दिसुन आले या वेळी वन परिमंडळ अधीकारी अविनाश राठोड , वनरक्षक चाथे , वनरक्षक खर्डे , नन्नावरे , वाघ , राठोड , आणि वन मजुर , युसुफ पठाण , आंबादास सुर्यवंशी , महाकाळ यांनी निरीक्षण केले अशी माहिती सावळदबारा वन परिमंडळ अधीकारी अविनाश राठोड यांनी दिली

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *