स्री जन्माचे स्वागत अनामत रक्कम ठेऊन…बेटी बचाव बेटी पढावचाही संदेश
गोंदिया:- ” मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पणती’ आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्या ताई कोण होईल, आई होणार नाही. जर आई झाली नाही तर मनुष्य निर्मिती होणार नाही. तर माणूसकी उरणार नाही. यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागत करा. भेद-भाव करु नका. हा संदेश देण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी नगरपंचायत द्वारे मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून मुलगी जन्मास आल्या नंतर “मुलिच्या नावे प्रत्येकी 1 हजार रुपये ठेव” स्वरूपात ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत ने घेतला आहे .या मुळे मुलींचा जन्म दर वाढण्यास नक्कीच मदत होनार आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम राबवत देवरी नगरपंचायतने जनजाग्रुती बरोबरच जिल्ह्यासह राज्यात आदर्श ठेवला आहे.

आज विविध क्षेत्रात महिला आपले स्थान निर्माण करत आहेत. असे असले तरी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत. बालविवाह, हुंडापद्धती या समस्या कायम आहेत. याचा परिणाम मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या जन्मदरावरही होतो आहे. मुलांच्या तुलनेत आजही मुलींची संख्या कमी आहे. यामुळे स्त्री जन्माचे स्वागत व्हावे. यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी नगरपंचायत च्या वतिने “स्त्री जन्माचे स्वागत:1 हजार रपये ठेव” उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरात जन्मलेल्या नवजात बालिकेचा जन्मसोहळा साजरा करण्यात येनार आहे. मुलगी, स्त्री यांना सन्मान देण्याबरोबरच त्यांना एक व्यक्ती म्हणून आदर देणे तो आचरणात आणणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटनकर यांनी सांगितले.
स्त्री जन्माचे स्वागत हा संस्कार घरा घरातू रुजला पाहिजे. संपूर्ण समाजात जनजागृती होण्यासाठी सरुवात ही देवरी नगरपंचायत मधुन व्हायला हवी. प्राथमिक शिक्षणातून मुलांचे विचार पक्के होत असतात. उद्याचे भविष्य घडवण्याची जबाबदारी शाळा आणि शिक्षकांची देखील आहे. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे. त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता स्त्री जन्माचे स्वागत देवरी नगरपंचायत 1 हजार रुपये सुरक्षा ठेव स्वरुपात ठेऊन सुरुवात केली आहे.